टाकळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज विजय कोळी यांना स्टार आयकॉन पुरस्कार प्रदान
वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी आदर्श व्यक्तिमत्व प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज विजय कोळी यांना स्टार आयकॉन पुरस्कार २०२४ ने नुकताच सन्मानित करण्यात आले.
पुणे येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमांमध्ये त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. युवराज कोळी हे सन २०१४ ते २०१९ अखेर पाच वर्षे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय व मिरज सिव्हिल हॉस्पिटल औषध वैद्यकीय शास्त्र जनरल मेडिसिन भागात काम पार पडले.
सन २०१९ ते २०२१ अखेर प्राथमिक आरोग्य केंद्र अ.लाट तालुका शिरोळ येथे वैद्यकीय अधिकारी तसेच २०२० मध्ये कोविड काळामध्ये कोविड केअर सेंटर शिरोळ येथे काम पाहिले.
२०२३ पासून आज अखेर प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी येथे प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. पूर परिस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रेकडील ११ गावांमध्ये आरोग्य सेवेचे काम त्यांनी चांगल्या रीतीने हाताळले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.