Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

कै चनगोंडा पाटील हनुमान सहकारी दूध संस्थेच्या वार्षिक फरक बिल व भेटवस्तू वाटप



दत्तवाड -

आजोबा कै चंनगोंडा  पाटील यांनी ज्या उदात्त हेतूने दूध संस्था स्थापन केली त्याला कधीही धक्का न लावता सभासदांच्या हिताचा कारभार करणार अशी ग्वाही चेअरमन बाबासो पाटील यांनी दिली ते येथील कै चनगोंडा पाटील हनुमान सहकारी दूध संस्थेच्या वार्षिक फरक बिल व भेटवस्तू वाटप कार्यक्रमात बोलत होते. 

       दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्थेने गोकुळने दिलेल्या फरक बिल मध्ये आपली संस्थेची रक्कम घालून म्हैस दुधासाठी 9.5% तर गाय दुधासाठी 5.5% इतके फरक बिल वाटप केले तर यावर्षी सर्वाधिक दूध संस्थेला घालणारे दूध उत्पादकांना प्रथम तीन क्रमांकांना म्हैस व गाय याप्रमाणे बक्षीस देण्यात आली. 

 राजगोंडा पाटील यांनी संस्थेच्या वर्षभराच्या कारभाराची माहिती प्रास्ताविक करून  दिली .

यावेळी सचिन चिखले, मिलिंद देशपांडे, रमेश मिठारे यांनी मनोगते व्यक्त केली आभार ज्येष्ठ संचालक अशोक पाटील टाकवडेकर यांनी मांनले 

यावेळी , व्हा. चेअरमन दौलत माने , अण्णासो पाटील, प्रकाश पाटील, सिद्धगौडा पाटील, अशोक पाटील ,सागर झुमके, संपत्ती खेमलापुरे बाळव्वा  नुले, तेजस वराळे ,महादेव मटाले यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते