ऊस दरासाठी दि.16 पासून शिरोळ तहसील समोर बेमुदत धरणे आंदोलन. धनाजी चुडमुंगे
ऊस दरासाठी दि.16 पासून शिरोळ तहसील समोर बेमुदत धरणे आंदोलन.
धनाजी चुडमुंगे
शिरोळ :शेतकऱ्यांना उसाचा परवडणारा दर मिळावा म्हणून गेले 15 दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. यापूर्वी दोन वेळा ऊस दर आणि इतर विषयावर शिरोळ तहसीलदार यांच्या समोर बैठका झाल्या त्यामध्ये ठरलेनुसार आज 12 तारखेपर्यंत सर्व मुद्यावर कार्यवाही करण्याचे कारखान्यांनी मान्य केले होते पण त्याची अंमलबजावणी कारखान्यांच्या कडून झालेली नाही म्हणून सोमवार दिनांक 16 डिसेंबर पासून शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी आज जाहीर केले.
ते आज शिरोळ तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हंटले आहे की शिरोळ तहसीलदार कार्यालयात दिनांक 5 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत 13 तारखेला पुन्हा बैठक घेण्याचे ठरले असताना बैठकीचे पत्र काढलेले नाही बैठक होणार की कारखान्यांना कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही म्हणून नाईलाजाने आम्हाला पुन्हा आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे नमूद आहे.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत
1) मागील 200 आणि चालूला पहिली उचल 3700 मिळावी
2) क्रमपाळी सार्वजनिक करून त्यानुसार भागातील ऊस प्राधान्याने तोडावा.
3) जानेवारी अखेर लावण आणि फेब्रुवारी अखेर खोडवा तोड व्हावी असा गाव वाईज प्रोग्राम तयार करून त्यानुसार ऊस तोड करावी.
4) इंट्री खुशाली बाबत परिपत्रक काढून सर्व मुकादम वाहनधारक आणि मशीन मालक यांना नोटीस लागू करावी.
या मुद्यांच्या पूर्ततेसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून होणार आहे.
