*पतसंस्था सक्षमीकरण करण्यासाठी पालक अधिकार्याची नेमणूक*
शिरोळ
सहकार आयुक्त यांच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थाचे सक्षमीकरणासाठी सहकार खात्याकडून मार्च २०२५ पर्यंतचा कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे माहीती शिरोळचे सहाय्यक निबंधक,अनिल नादरे यांनी पतसंस्था मासिक सभेत सांगितले.पतसंस्थेचे आदर्श उपविधी प्रमाणे व नियमाक मंडळाने वेळोवेळी काढलेल्या परिपत्रकानुसार ज्या पतसंस्थेचे दैनिक रोखता प्रमाण मागील तिमाहीच्या एकूण ठेवीच्या १टक्का पुढील तिमाही करिता असावा, वैधानिक तरलता प्रमाण मागील तिमाहीच्या एकूण ठेवीच्या २५टक्के पुढील तिमाही करिता असावा,सी.आर.ए.आर.किमान ९टक्के ,सी.डी.रेशो६०टक्के ते ७०टक्के,ढोबळ एन.पी.ए.१०टक्के पेक्षा कमी,निव्वळ एन.पी.ए.५टक्के पेक्षा कमी,थकबाकी टक्केवारी ५ टक्के पेक्षा कमी असावा.ज्या पतसंस्थेने वरिल नियमाचे पालन केले नाहीत.अशा पतसंस्थावर पालक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे अधिकार्यांची नेमणुक केली असून त्यांना दप्तर उपलब्ध करून देण्याचे सांगितले.
या बैठकीस सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहकारी अधिकारी संतोष कांबळे, पी.जे.मेश्राम,विनायक खोत यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे प्रशिक्षक प्रा.एस.टी.जाधव, लेखापरीक्षक-एस.डी. देशमुख ,के.एस.माळी,सुनिता भांबिष्ठे,मनिषा लोखंडे,अभिजित बडवे,सुनिल रेंदाळकर व पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष- रमेशकुमार मिठारे आदिसह शिरोळ तालुक्यातील पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

