*डॉक्टर ओंकार निंगनुरे यांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान*
*डॉक्टर ओंकार निंगनुरे घोसरवाड यांना पूणे येथे धन्वंतरी पुरस्कार प्रदान*
पूणे -पुणे येथील पुणे न्यूज एक्सप्रेस मार्फत देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार धन्वंतरी 2024 नुकताच पुणे येथील कोरेगाव पार्क येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात घोसरवाड तालुका शिरोळ येथील डॉक्टर ओंकार निंगनूरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे न्यूज एक्सप्रेस मार्फत दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते यावर्षीचा धन्वंतरी पुरस्कार घोसरवाड येथे आयुर्वेदिक औषध उपचार करणारे, व अल्पावधीतच कोल्हापूर सांगली सातारा कर्नाटकातील बेळगाव गोवा येथील अनेक रुग्णांना विविध आजारातून आयुर्वेदिक उपचारातून बरे करणारे नामवंत डॉक्टर ओंकार निंगनुरे यांना पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक डॉक्टर आयुब शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक निवेदिता माने वारणा कोडोली यांनी केले सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद देशपांडे यांनी केले तर आभार पुणे न्यूज एक्सप्रेसचे महबूब सर्जेखान यांनी मांडली.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या पुरस्काराबद्दल डॉक्टर निगनूरे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
