धोंडीलाल चाऊस यांना इचलकरंजी येथे समाजगौरव पुरस्कार प्रदान
धोंडीलाल चाऊस यांना इचलकरंजी येथे लोकराजा शाहू महाराज समाजगौरव पुरस्कार प्रदान
दत्तवाड -
घोसरवाड ता शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते, सा रे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती उपाध्यक्ष, धोंडीलाल चाऊस यांना इचरकंजी येथील शाहू महोत्सव अंतर्गत सामाजिक कार्याबद्दल देण्यात येणार राज्यस्तरीय लोकराजा शाहू समाज गौरव पुरस्कार इचलकरंजी चे माजी नगराध्यक्ष रवी साहेब रजपुते व अरुण कांबळे सर या मान्यवरांच्या हस्ते इचलकरंजी येथे प्रदान करण्यात आला.
धोंडीलाल चाऊस यांनी सामाजिक कार्यात नेहमी सहभाग घेतला आहे कोरोना काळात अनेकांना मदत केली आहे महापुरात त्यांनी अनेक कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान जानकी वृद्धाश्रम येथे धान्य वाटप तर बाल उद्यान अनाथ मुलांना येथे धान्य वाटप, आश्रम शाळेला एलईडी टीव्ही ,वह्यावाटप अशी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवली आहेत तर कोरोना काळात नंतर कोरोना योद्धांचा सत्कार करून त्यांनी समाजापुढे एक वेगळा उपक्रम राबवला आहे. कोरोना काळात सॅनिटाइज वाटप केले आहे. याबरोबरच गॅस दरवाढ आंदोलन अशी विविध आंदोलने करून त्यांनी सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
या समाजात आपण काही समाजाचे देणे लागतो या भावनेतून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय श्री स्वामी विवेकानंद पुरस्कार संघर्ष नायक मीडिया यांच्याकडून आत्मसन्मान गौरव पुरस्कार, पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने यांच्याकडून समाजभूषण पुरस्कार, शांभवी महिला बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था कोल्हापूर यांच्याकडून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाज रत्न पुरस्कार असे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
त्यांची या कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना शाहू महोत्सव कबनूर इचलकरंजी यांच्याकडून राज्यस्तरीय लोकरजा शाहू समाज गौरव पुरस्कार मान्यवर जास्त प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
