*नेहा नदाफ होम मिनिस्टर च्या विजेता*
दत्तवाड महिला मंच आयोजित होम मिनिस्टर स्पर्धे मध्ये सौ. नेहा नदाफ यांनी प्रथम क्रमांक पटकावून अकरा हजार रुपये ची पैठणी व सोन्याची नथीचे मानकरी झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन त्रिशला संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले तर प्रमुख उपस्थिती आमदार शशिकला जोल्ले ,श्रीमंत सरकार सौ दर्शनादेवी करण सिंग घोरपडे, श्रीमंत सरकार सौ गायत्री देवी भवन सिंग घोरपडे, मिनाज जमादार, या होत्या.
आमदार शशिकला जोल्ले यांनी महिलांना सबलीकरणासाठी शासन विविध योजना राबवत असल्याची माहिती देऊन महिलांनी आता पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले याबरोबरच आपली संस्कृती व संस्कार टिकवण्याची जबाबदारी महिलांकडे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
द्वितीय क्रमांक वैशाली चौगुले, तृतीय क्रमांक . स्नेहा कुंभार यांनी पटकावला उत्तेजनार्थ कोमल बिरनगे, स्वाती करजगी, अनिता हलकर, अप्सरा नाईकवाडे, रोहिणी सूर्यवंशी, अश्विनी पाटील, दिपाली कोकणे. यांनी मिळवला
. यावेळी झालेल्या वेशभूषा स्पर्धांमध्ये लहान गटात प्रज्ञा कांबळे, पूर्वा खोत, अस्ता कोकणे,रितिशा हिमगिरे यांनी बक्षिसे जिंकली तर मोठा गटांमध्ये अक्षरा कुंभार, आराध्या चौगुले, आर्या पाटील, अनुष्का कांबळे यांनी बक्षीस पटकावली. बालचमुनी केलेली वेशभूषा यावेळी आकर्षित झाली.
प्रथम राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी स्फूर्ती महिला मंचच्या महिलांनी महिला सबलीकरणवर नाटिका सादर केली
प्रथम स्वागत कांचन चौगुले, प्रास्ताविक संगीता विभुते,आभार झुणके यांनी मांनले.
यावेळी श्रीमंत सरकार करणसिंग घोरपडे, श्रीमंत सरकार भवानीसिंग घोरपडे, बबनराव चौगुले, संजय पाटील यांच्यासह दत्तवाड महिला मंचच्या सर्व सदस्य महिला मोठ्या संख्येने

