Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दे .भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक विशाल आवटी, भुपाल मिसाळ संजय देसाई यांचा सत्कार

 


दत्तवाड 

येथील दत्तवाड ग्राम विकास सेवा संस्था मर्फत दे .भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक विशाल आवटी, भुपाल मिसाळ संजय देसाई यांचा सत्कार करण्यात आला. 

नुकतीच दे भ रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर  कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली या निवडणुकीत विशाल आवटी अकिवाट भोपाल मिसाळ घोसरवाड संजय देसाई सदलगा यांची निवड झाली यांचा सत्कार येथील सेवा सोसायटीच्या सभागृहात करण्यात आला यावेळी सोसायटीचे चेअरमन मलगोडा पाटील यांनी लहान शेतकऱ्यांच्या व्यथा संचालकांनी बैठकीत मांडून त्या सोडवाव्यात  अशी अपेक्षा मनोगतात व्यक्त केली. 



यावेळी उपसभापती वीरूपाक्ष हेरवाडे, संचालक बाबासो पाटील ,विरगोंडा पाटील ,आलगोंडा पाटील, एन एस पाटील, संजय माने ,गोरक्ष कांबळे, श्रीमती सुवर्णा पाटील, श्रीमती मंगला चौगुले, राजू पाटील सुळकुडे, के पी पाटील ,संदीप पाटील गुमटे यांच्यासह सोसायटीचे कर्मचारी सभासद उपस्थित होते