विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पंख फुटले पाहिजेत -सौ.स्वरुपा पाटील यड्रावकर तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेस उत्साहात प्रारंभ.
विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला पंख फुटले पाहिजेत -सौ.स्वरुपा पाटील यड्रावकर
तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेस उत्साहात प्रारंभ.
दत्तवाड:प्रतिनिधी :जिल्हा परिषद कोल्हापूर,शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ आयोजित तालुकास्तरीय कलाविष्कार सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन कलानगरी केंद्र शाळा नांदणी ता.शिरोळ येथे सुरु झाली.
प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.स्वरूपा पाटील यड्रावकर म्हणाल्या की बालमन जे जिल्हा परिषदेच्या शाळात शिकणाऱ्या मुलांना घडविणारे शिक्षक प्रतिभावान आणि कल्पकता असणारे आहेत त्या सर्वांचे कौतुक करते. अभिनंदन करते.जी प्रतिभावान उद्याचे भविष्य आहेत,सुजाण नागरिक आहेत. त्यांना घडविण्यासाठी प्रतिभावान शिक्षकांची गरज आहे. या जिल्हा परिषदेच्या शाळामधून जबाबदारी घेणारे हे शिक्षक आहेत. त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे.आपल्याला दिसते सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा रूप बदलत आहे. व्यवस्थापन बदलत आहे. खूप चांगल्या पध्दतीने खाजगी शाळांच्या तुलनेने या शाळा पुढे येत आहेत.यासाठी शिक्षकांनी मोठे योगदान दिलेले आहे.समर्पित झालेले आहेत. त्यामुळे चांगले उपक्रम आपणाला पाहायला मिळतात.सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे.त्याच्या प्रतिभेला पंख फुटले पाहिजेत.यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक करुन अभिवादन करते.
यावेळी गणेश बेकरीचे उद्योजक आण्णासाहेब चकोते यावेळी बोलताना म्हणाले की,नियोजन कौतुकास्पद आहे.आपल्या तालुक्यात कलाविष्कार व सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हापरिषद शाळांमध्ये त्या पध्दतीने नियोजन केले आहे.जर आज पाहिले तर इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये फी घेवून सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात.परंतु या ठिकाणी पाहिले तर चांगला उत्साह आणि त्याच लेव्हलच नियोजन आणि मुलांचे सादरीकरण कौतुकास्पद आहे. इयत्ता पहिलीच्या मुलाची शिवरायांबद्दल उद्घोषणा,जयघोषणा केलेली पाहिली की त्यावरून लक्षात येते शिक्षकांनी किती यथार्थ प्रयत्न केलेले असतील. कष्ट घेतले असतील त्याबद्दल सर्वांचे कौतुक आहे.
स्वागत केंद्र प्रमुख शिवाजी भोसले यांनी तर प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी यांनी केले. आभार केंद्र समन्वयक प्रकाश खोत यांनी मानले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी नारायण घोलप,सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे,गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी,सरपंच सौ.संगीता तगारे,उपशिक्षणाधिकारी प्रिमेश वाघ,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,नारायण पाटील, उपसरपंच सौ.वैशाली महावीर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती केंद्रशाळा अध्यक्ष संजय ऐनापूरे,कन्या नांदणीचे अध्यक्ष प्रशांत लठ्ठे,आडकेवाडीचे अध्यक्ष विनोद कोळी,माणगावेवाडीचे अध्यक्ष महावीर माणगावे,सर्व केंद्रप्रमुख,सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधी,चेअरमन व संचालक शिक्षक बँक व शिक्षक पतसंस्था,सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.
बुधवार दि.१५ जानेवारी२०२५ रोजी लहान गटातील समूहगीत, समूहनृत्य,नाटयीकरण,कथाकथन, प्रश्नमंजूषा स्पर्धा प्रकार संपन्न झाल्या.त्याचे बक्षिस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे, नांदणी केंद्र प्रमुख शिवाजी भोसले,केंद्र समन्ययक प्रकाश खोत,केंद्रशाळा मुख्याध्यापक दयानंद दिपंकर यांचेसह नांदणी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,शिक्षकवृंद,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
