श्री विद्यासागर हायस्कूल मध्ये हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा*
*श्री विद्यासागर हायस्कूल मध्ये हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा*
अकिवाट ता. शिरोळ येथील श्री विद्यासागर हायस्कूल मध्ये माता पालकांचा हळदीकुंकू , फनी गेम्स, लकी ड्रॉ पैठणी, व पालकांचा सांस्कृतीक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी सारिका सुहास रायनाडे जयसिंगपूर, जयश्री सुधाकर इंगळे सैनिक टाकळी ,राणी तानाजी खेमलापुरे दत्तवाड, प्रशालाचे चेअरमन के टी चौगुले, श्रीकांत कल्याण्णावर गुरुजी, मुख्याध्यापक डी. बी वाडकर, पर्यवेक्षक एम बी पाटील प्रमुख उपस्थित होते.
स्फूर्ती महिला मंच दतवाड यांनी प्रबोधनात्मक नाटिका सादर केली तर माता पालकांनी विविध प्रकारची सामूहिक गीते, वैयक्तिक नृत्य सादर केले.
लकी ड्रॉ पैठणीच्या विजेत्या प्रथम श्वेता सचिन चौगुले बस्तवाड ,कुसुम राजगोंडा पाटील अक्किवाट, सरोजनी विजय चव्हाण घोसरवाड या विजेत्या ठरल्या त्यांना मोरणी साडी कुरुंदवाड अरुण संकपाळ यांच्याकडून पैठणी देण्यात आली.
यावेळी राणी खेमलापुरे, सारिका रायनाडे, यांनी मनोगत व्यक्त केली तर अध्यापक मनोगते जे एस गीताजे, तर पालक मनोगत अश्विनी चौगुले व सरोजनी चव्हाण यांनी व्यक्त केले.
प्रथम स्वागत व प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापका पी व्ही पाटील यांनी केले आभार पी ए भोकरे यांनी मांनले तर सूत्रसंचालन जे एस गीताजे व ऐनापुरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील विविध समित्यांचे सदस्य अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
