Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*सर्वसामान्यांना महसूल साक्षरता करण्यासाठीच शिबिराचे आयोजन -उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले*

 


*सर्वसामान्यांना महसूल साक्षरता करण्यासाठीच शिबिराचे आयोजन -उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले*

सामान्य नागरिकांना महसूल साक्षरता करून त्यांच्या घरापर्यंत सेवा देण्यासाठीच या शिबिराचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी केले त्या दत्तवाड ता. शिरोळ येथे  आयोजित उपविभागीय इचलकरंजी अंतर्गत अधिकार अभिलेखा व महसूल विषयक मार्गदर्शन व समस्याचे निराकरण या शिबिरात बोलत होत्या. 

यावेळी त्यांनी महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना विविध समस्यांचे निराकरण करण्यावर भर देणार असून यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 149 अंतर्गत  माहिती दिली. यामध्ये वारस नोंदी बाबत , वतन व इनाम जमीन वर्ग करणे बाबत, तुकडेबंदी जोड बंदी व्यवहार पुनर्वसन शेरा कमी करणे, नवीन रस्ता व रस्त्यातील व रस्त्यातील अडथळा दूर करणे गट खुला करण्याबाबत बाबत, वर्ग दोन वरील कर्ज मागणीसाठी आवश्यक कागदपत्रे, महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन कलम 43 ची अट शिथिल करण्याबाबत यावर्षी माहिती देण्यात आली 

      यावेळी उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते इ रेशन कार्ड, डेमोशील प्रमाणपत्र मतदार नोंदणी प्रमाणपत्र याचे वाटप करण्यात आले.


     यावेळी प्रांताधिकारी चौगुले यांनी शालेय विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण या अंतर्गत महसूल विभागात येणाऱ्या सातबारा, आठ अ, ई पीक पाणी या उताऱ्यांची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले.

    तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आपल्या मनोगत सामान्य नागरिकांच्या कामाचा निपटारा त्यांच्या गावातच व्हावा यासाठी शासनाने राबवलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.

    यावेळी गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले यांनी वर्ग दोन जमिनी बाबत , तर राजगौडा पाटील यांनी पुरवठा विभागाबाबत प्रश्न उपस्थित करून  शंका विचारल्या. दतवाड ग्रामपंचायतीमार्फत सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी कचरा टाकण्यासाठी जागेची मागणी करणारे निवेदन दिले. 

      यावेळी दानवाडचे सरपंच डॉ.डी सी पाटील घोसरवाड चे सरपंच साहेबराव साबळे, सैनिक टाकळी चे हरिचंद्र पाटील,बी वाया शिंदे, दतवाडचे उपसरपंच रफिक मुल्ला, यांच्यासह दतवाडचे मंडल अधिकारी नितीन कांबळे मच्छिंद्र कुंभार मच्छिंद्र कुंभार संतोष पाटील अमित पडळकर ग्राम महसूल अधिकारी इकबाल मुजावर, जालबा मेटकर, राहुल सनदी ,सुरज माने, गणेश आवळे ,अनंत दांडेकर ,संभाजी माने, संतोष उपाध्ये अभिजीत पाटील, यांच्यासह दतवाड दानवाड सैनिक टाकळी राजापूर खिद्रापूर घोसरवाड येथील पोलीस पाटील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

   प्रथम स्वागत व प्रास्ताविक मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सदाशिव निकम यांनी केले.