*स्मार्ट चॅम्पस् टाकळी इंग्लिश स्कूलमध्ये
*स्मार्ट चॅम्पस् टाकळी इंग्लिश स्कूलमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाने प्रजासत्ताक दिन साजरा.*
टाकळी :- राष्ट्रप्रेमाची साक्ष देणाऱ्या रांगोळ्या, स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी विद्यार्थ्यां स्मार्ट चाम्पस् टाकळी इंग्लिश स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
प्रजासत्ताक दिनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे तसेच विद्यार्थ्यांच्या अपूर्व उत्साहाने स्मार्ट चॅम्पस् स्कूलच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास वेगळीच रंगत आली. भल्या सकाळी आवेश पूर्ण घोषणांनी व देशभक्तीपर गीताने परिसर दुमदुमून गेला होता. प्रमुख पाहुणे अनिल पाटील ऑर्डीनरी कॅप्टन इंडियन आर्मी आणि श्री. अर्जुन इंगळे उद्योजक पुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर डान्स सैनिक टाकळीच्या सार्वजनिक मैदानात सादर केला आणि उपस्थितांचे दाद मिळवली. यादरम्यान अब्याकस मध्ये नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन विजय गवंडी सर, व्हा.चेअरमन सौ.राजश्री मॅडम , संस्थेचे सल्लागार श्री.अजित पाटील, व श्री.संजीव पाटील , टाकळी शाखेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील मॅडम, कुरुंदवाड शाखेच्या मुख्याध्यापिका सौ. अमृता माळी तसेच दोन्ही शाखेचे शिक्षक वृंद आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नितीन कोरे सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता शोभा कोळी मॅडम यांनी केली.
