श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
अकिवाट येथील श्री विद्यासागर हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी प्रमुख पाहुणे युवराज दशरथ लाटवडे , माजी सैनिक यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले प्रशालेचे चेअरमन कमलाकर चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक दादासो वाडकर यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताव केले व प्रमुख पाहुण्यांचे परिचय दिला या कार्यक्रमासाठी प्राथमिक विभागाचे चेअरमन अनिल चौगुले, सरपंच वंदना सुहास पाटील , शालेय समिती सदस्य व पालक वर्ग,गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य सर्व अध्यापक अध्यापिका व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन व मानवंदना दिली तसेच विद्यालयामार्फत विविध गुणदर्शन कार्यक्रम व शहीद जवान व स्वातंत्र्य सैनिक यांच्या विषयी नाटिका सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमास ग्रामस्थ व पालकांनी प्रतिसाद दिला.
