Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*दत्तवाड येथे घरकुल बांधकामांची सुरुवात*



 दतवाड

येथील प्रंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल बांधकामाची सुरुवात प्रजासत्ताक दिना निमित्त  सरपंच चंद्रकांत कांबळे ,उपसरपंच रफिक मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आली. 

   दत्तवाड तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत मार्फत पंतप्रधान आवास योजनेतील ९१ लाभार्थी असून त्यांच्या घरकुलाचे बांधकाम २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्ताने करण्यात आले. यातील अनुदानाचा पंधरा हजार रुपयांचा पहिला टप्पा लाभार्थीच्या खात्यावर जमा झाला असून टप्प्याटप्प्याने अनुदान लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. घर बांधकामाचे एकूण एक लाख वीस हजार  व शौचालय बांधकाम ,सौरऊर्जा याचे वेगळे अनुदान लाभार्थीला मिळणार आहे. 

     यावेळी ग्रामपंचायत सदस्य देवराज पाटील, बाबुराव पवार, मनीषा चौगुले, सीमा पाटील, रूपाली पोवाडी, अनिता कडाके, राजू पाटील सुळकुडे,  ग्रामविकास अधिकरी संतोष चव्हाण, प्रमोद पाटील,दादा पोवाडी,चंद्रशेखर कलगी समुद्र कांबळे, नाना कासार यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.