Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सौ बिस्मिल्लाह मुजावर यांचे पुस्तक उर्दू विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल : आ.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर



दत्तवाड 

        उर्दू वि.मं.औरवाड शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका ज्यांनी शाळेत स्पर्धा परीक्षेचा पाया रचला, त्या "बिस्मिल्लाह मुजावर"  यांनी लिहिलेल्या इ. दुसरी प्रज्ञाशोध मार्गदर्शिका "मंजिल ब मंजिल"(उर्दू माध्यम) चे प्रकाशन आमदार डॉ .राजेंद्र पाटील यड्रावकर  यांच्या हस्ते दत्तवाड येथे झाले. ही मार्गदर्शिका उर्दू माध्यमांच्या मुलांसाठी दिशा देणारी ठरेल असे उदगार  आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी काढले.

     आजच्या या स्पर्धात्मक युगात जि.प.कोल्हापूर मार्फत इ.चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षा व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत इ. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. अशा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास पहिलीपासूनच विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याच्या दृष्टीने ही मार्गदर्शिका मैला चा दगड ठरणार आहे. मागील वर्षभरात अतिशय कष्ट घेऊन अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून सौ बिस्मिल्लाह मुजावर यांनी इयत्ता दुसरीसाठी मार्गदर्शिका तयार केली आहे. विशेषतः उर्दू माध्यमासाठी प्राथमिक स्तरावर अशी कोणतीच स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शिका अस्तित्वात नसल्यामुळे अतिशय तळमळीने व आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सौ मुजावर मॅडमांनी हे पुस्तक लिहिले आहे. आणि आता याचा फायदा फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर राज्यातील सर्व उर्दू शाळांना ही पुस्तक आपण उपलब्ध करून देवू असे अभिवचन आ.डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रकाशना वेळी दिले. जेणे करून या पुस्तक निर्मितीसाठी घेतलेले कष्ट सार्थ ठरले आहे.

       मुख्याध्यापिका सौ.जकीया चौगले यांनी प्रोत्साहन दिले तर दिलीप शिरढोणे, राजू मुजावर, आसिफ मुजावर यांनी मार्गदर्शन केले. पी.एम.श्री.उर्दू विद्यामंदिर चंदगड चे अध्यापक नियामत मकानदार यांनी पुस्तकाचे सर्व टायपिंगचे कार्य केले.