उर्दू विद्यामंदिर खिद्रापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय.. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
दत्तवाड
शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद, कोल्हापूर व न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अ. लाट यांचे संयुक्त विद्यमाने ५२वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन २०२४ -२५ चे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अ. लाट येथे नुकतेच पार पडले . यात उच्च प्राथमिक विद्यार्थी गट (६ वी ते ८ वी) मध्ये उर्दू विद्या मंदिर खिद्रापूर ता.शिरोळ ने जिल्ह्यात "द्वितीय क्रमांक" संपादन केले त्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. त्यांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उर्दू विद्या मंदिर खिद्रापूर शाळेच्या विद्यार्थीनी कु.अक्सा रियाज जमादार व कु.मिसबाह रमजान घुनके यांनी मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक अमानुल्लाह मुल्ला व विषय शिक्षक नाजीम जमादार यांच्या मार्गदर्शना खाली कचरा वेचणारी मशीन (garbage disposal machine) या उपकरणाचे सादरीकरण केले होते.
या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, तहसीलदार अनिल कुमार हेळकर, जिल्हा परिषद माध्यमिक विस्तार अधिकारी सौ. रत्नप्रभा दबडे व सौ.जयश्री जाधव, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरोळ सौ भारती कोळी,कोजिमाशीचे तज्ञ संचालक दादासो लाड, राज्य विज्ञान समितीचे उपाध्यक्ष श्रीशैल मठपती व इतर मान्यवर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी मुसा सुतार, केंद्रप्रमुख रियाजअहमद चौगुले यांनी प्रोत्साहन दिले. तर नाजीम जमादार, रिजवान पटेल व सौ बुशेरा पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.
