स्फूर्ती महिला मंच वतीने कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न
स्फूर्ती महिला मंच वतीने कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न
दत्तवाड -
येथील स्फूर्ती महिला मंच आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाबा महाराज मठाचे प्रमुख ऋषिकेशानंद महाराज होते. तर सरपंच चंद्रकांत कांबळे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा चौगुले, सीमा पाटील, कांचन चौगुले माजी सरपंच. झुणके उपस्थित होते.
प्रबोधनात्मक कीर्तनकार ह भ प संध्याताई पाठक सांगली यांनी महिलांनी स्वधर्म ओळखून कर्तुत्व करावे. सध्या महिला घरात व करिअरमध्ये दोन्हीकडे उत्कृष्ट कार्य करीत असून त्यांनी आपले कार्यक्षेत्र वाढवावे असे त्या म्हणाल्या
प्रथम गुरुमाऊली भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम झाला
यावेळी प्रमुख मान्यवरांसह देणगीदार व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
स्वागत राणी खेमलापुरे, तर प्रास्ताविक मंदा देशपांडे यांनी केले आभार संगीता विभुते यांनी मानले पाहुण्यांचा परिचय सीमा कुलकर्णी यांनी करून दिला
कार्यक्रमास स्फूर्ती महिलांच्या पूजा पोवाडी, उज्वला टारे, राजेश्वरी पाटील सविता पाटील, बिस्मिल्ला काले मुमताज मुल्ला, साधना सावंत यांच्यासह महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
