Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड येथे भाजप पक्ष प्रवेश व विश्वकर्मा योजना कार्यक्रम संपन्न..



 दत्तवाड येथे भाजप पक्ष  प्रवेश व विश्वकर्मा योजना कार्यक्रम संपन्न..

दत्तवाड -- पी एम विश्वकर्मा योजना, महिला बचत गट  योजना यासंबंधी माहिती भाजप अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस व विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटर ओनर आशिया गवंडी यांनी दिले व तसेच यासंबंधीची इतर माहिती विश्वकर्मा योजना शिरोळ तालुका अध्यक्ष सुधीर शहापुरे यांनी दिले.

 यावेळी काँग्रेस  पक्षातील चंद्रकांत बिरणगे, स्वप्नील शिंगे, बाळासो बिरणगे, संजय बिरणगे,तसेच रमेश खरपी ,कुमार हेरवाडे व इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.  



यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा राजगोंडा पाटील यांनी 157 लाडक्या बहिणींना पैसे मिळवून दिल्याबद्दल व इतर अनेक योजना कार्यक्षमपणे राबविल्याबद्दल उपस्थित महिलांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा मागासवर्गीय सेल शिरोळ तालुका उपाध्यक्ष तेजस वराळे, भाजपा दत्तवाड अध्यक्ष कुमार पाटील, अशोक नेर्ले, सुनील कुंभार कलगोंडा पाटील, योजना लाभार्थी जयदीप सुतार, माणिक सुतार, व तसेच घोसरवाड, राजापूर,नवे दानवाड ,खिद्रापूर जुने दानवाड, दत्तवाड व इतर गावातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...