ग्रामीण रुग्णालयात मधमाशांचा हल्ला, नऊ जण जखमी, दोन गंभीर
ग्रामीण रुग्णालयात मधमाशांचा हल्ला, नऊ जण जखमी, दोन गंभीर
ग्रामीण रुग्णालयात ची इमारत नूतन बांधकाम सुरू असल्याने सध्या दसरा चौक येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये कामकाज सुरू आहे या इमारतीच्या मागील बाजूस गाव पाणीपुरवठ्याची पाण्याची टाकी आहे त्या टाकीला मधमाशीचे पोळे आहे आज दुपारी बाराच्या सुमारास अचानक या मधमाशीने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत घुसून हल्ला केला. यावेळी दवाखान्यात डॉक्टर्स ,नर्स, आरोग्य सेविका व रुग्ण यांची संख्या भरपूर होती अचानक हल्ल्याने सर्वजण भयभीत पळत सुटले यामध्ये प्रभू शिरगावे अजित कांबळे यांना डोके ,मान ,कपाळ ,कान, हात ,पाय या ठिकाणी चावा घेतला त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तर सिस्टर परनाज सनदी,गीता नागूलपिल्ले अशा सेविका शुभांगी उरुणकर, वैशाली उरुणकर, आयेशा नदाफ, सुमन भाटले, सुमन गुरव अशी जखमी झाल्यांची नावे आहेत. किरकोळ जखमींना येथेच उपचार करून घरी पाठवण्यात आले.
आज बुधवार असल्याने गर्भवती महिला व बालकांना लसीकरण देण्यात येते त्यामुळे यांची संख्या जास्त होती. पण बारा वाजता लसीकरण पूर्ण झाले होते यातील बरेच रुग्ण घराकडे गेले होते त्याचवेळी हा हल्ला झाला हल्ला आधी झाला असता तर रुग्ण संख्या वाढली असती.
