श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट गणित प्रज्ञाशोध परीक्षेत मोठे यश
*श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट गणित प्रज्ञाशोध परीक्षेत मोठे यश*
अकिवाट श्रीनिवास रामानुजन यांच्या नावाने मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत दरवर्षी इयत्ता आठवी व पाचवी मधील विद्यार्थ्यांची गणित विषयाची प्रथम प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते त्यामध्ये श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाट मधील चार विद्यार्थी प्राविण्य प्राप्त झाले त्यानंतर पुन्हा त्यांची प्रज्ञा प्राप्तीसाठी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये शुभम विजय पाटील व अन्विता आदिनाथ ऐनापुरे या दोन विद्यार्थ्यांनी गणित विषयातील प्रज्ञा प्रमाणपत्र प्राप्त झाले या विद्यार्थ्यांना विद्यासागर हायस्कूल मधून पूजा भोकरे मॅडम पर्यवेक्षक महावीर पाटील सर व मुख्याध्यापक दादासो वाडकर सर यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल त्यांचे पालक ग्रामस्थ सर्व अध्यापक अध्यापिका सर्व शालेय समिती चेअरमन व सदस्य यांच्यामार्फत कौतुक केले जात आहे या यशाबद्दल विद्यासागर हायस्कूलचे देखील सर्वत्र कौतुक केले जात आहे
