Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

शिरोळ तालुकास्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम


 

शिरोळ तालुकास्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम

दत्तवाड:प्रतिनिधी :श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड ता.शिरोळ येथे जिल्हा परिषद कोल्हापूर, पंचायत समिती शिरोळ व डाएट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळ पंचायत समिती शिरोळ चे गटविकास अधिकारी नारायण घोलप, गटशिक्षणाधिकारी सौ. भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड येथे दि.२०ते २१ मार्च २०२५ रोजी संपन्न होत आहे.

           श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे.पाटील यांनी स्वागत केले.हिंदूराव फास्के यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणाचा हेतू विशद केला.




        प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक हिंदूराव फास्के निपुण भारत अभियान, मेहबूब मुजावर यांनी बालकांचे हक्क व सुरक्षितता,महेश घोटणे गुणवत्तापूर्ण शिक्षण व शाळा व्यवस्थापन समिती,विलास बंडगर यांनी शिक्षण कायदा,ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समिती,सौ.जयश्री गिताजे यांनी शालेय आर्थिक व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

              तालुकास्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षणासाठी शिरोळ तालुक्यातून मराठी माध्यमाचे १३४ मुख्याध्यापक उपस्थित होते.वर्ग समन्वयक शंकर बरगाले,प्रतिमा माने,अनिल पवार यांनी प्रशिक्षणाचे उत्तम नियोजन केले.