शिरोळ तालुक्यातील८ जणांना मुख्याध्यापक पदोन्नती. दत्तवाड केंद्रमुख्याध्यापक पदी सतिश यळगुडे.
शिरोळ तालुक्यातील८ जणांना मुख्याध्यापक पदोन्नती.
दत्तवाड केंद्रमुख्याध्यापक पदी सतिश यळगुडे.
दत्तवाड:प्रतिनिधी :जिल्हा परिषद कोल्हापूर प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सेवाज्येष्ठतेने मुख्याध्यापक पदोन्नती घेण्यात आली. त्याअंतर्गत शिरोळ तालुक्यातील ८ प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली.
गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी यांनी पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापकांना शुभेच्छा देत तालुक्यात गुणवत्तावाढीच्या उपक्रमात योगदान देण्याचे आवाहन केले.मुख्याध्यापक पदोन्नती प्राप्त पुढीलप्रमाणे:१.रामचंद्र लठ्ठे -लाटवाडी,२.अनिता संकपाळ- कुमार शिरढोण,३.सतीश यळगुडे -केंद्र दत्तवाड,४.सुरेश यळगुडे - मराठी आलास,५.शामराव कांबळे -कुमार हेरवाड,६.राजेंद्र माने -कन्या टाकवडे, ७.लक्ष्मी कांबळे-तेरवाड,८.सुनंदा यळगुडे - कवठेगुलंद गाव.
या मुख्याध्यापकांचे स्वागत शाळांमध्ये करण्यात आले.दरम्यान केंद्रीय कन्या शाळा दत्तवाड येथे पदोन्नतीने मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेल्या सतिश यळगुडे यांचे स्वागत करताना केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे म्हणाले की केंद्रात २९ वर्षे सेवा करताना सतिश यळगुडे यांनी अनेक उपक्रम राबविले.प्रशानसनाला सहकार्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याचे गौरवोद्गार केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे यांनी काढले.
यावेळी माजी केंद्र मुख्याध्यापक राजू जुगळे,कुमार सिदनाळे, मुख्याध्यापक सहदेव माळी,दिलीप शिरढोणे,रावसाहेब पाटील,भालचंद्र खोत,शरद अवघडी,विनायक कांबळे,जयश्री निर्मळे,रुकसाना नदाफ,प्रियांका कांबळे,साधना सावंत उपस्थित होते.
