Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

पै.शुभम सिदनाळे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न. ग्रामपंचायत,कुस्ती संघटना यांचा पुढाकार.पत्रकार संघाच्या वतीने मानपत्र.

 


पै.शुभम सिदनाळे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न.

ग्रामपंचायत,कुस्ती संघटना यांचा पुढाकार.पत्रकार संघाच्या वतीने मानपत्र.

दत्तवाड : प्रतिनिधी :दत्तवाड गावचे सुपुत्र पैलवान शुभम सिदनाळे यांनी पुणे येथे आयोजित हिंदू गर्जना चषक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पै. मुन्ना झुंजूरके यांच्यावर निर्णायक लढतीत तब्बल ९ गुणांच्या फरकाने विजय संपादन केले होते. पै.शुभमने २.५० लाख रुपये,चांदीची गदा व थार गाडी पटकावून कोल्हापूर जिल्ह्याच्या व दत्तवाड नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून पुढील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी दंड थोपटले. याबद्दल शनिवार दिनांक २२ मार्च २०२५ रोजी दत्तवाड नगरीतील मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.चौकाचौकात जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

            सायंकाळी गांधी चौकात श्रीमंत कर्णसिंह घोरपडे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत दत्तवाड, कुस्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. दत्तवाड पत्रकार संघामार्फत मानपत्र देवून गौरविण्यात आले.दत्तवाड व परिसरातील विविध संस्था,सामाजिक संघटना,तरुण मंडळे,मल्ल,व्यक्ती यांचेकडून सत्कार करण्यात आले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. माजी आमदार उल्हास पाटील,दक्षिण भारत जैन सभेचे भालचंद्र पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.




          श्रीमंत भवानीसिंह घोरपडे सरकार,राजगोंडा पाटील,अॅड.सुरेश पाटील,बसगोंडा पाटील,संजय पाटील, बबनराव चौगुले,कुस्ती निवेदक सुकुमार माळी यांनी मनोगतातून कौतुक करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बाबूराव पोवार,प्रमोद पाटील, दौलत माने, संजय माने ,बाबासो नागराळे , प्रवीण सुतार. ग्रामपंचायत सदस्य,  दतवाड कुस्ती कमिटीचे सदस्य घोसरवाड ,टाकळीवाडी दानवाड येथील कुस्तीप्रेमी विविध संस्थांचे पदाधिकारी ,सदस्य सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

          सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचलन सुभाष कुरुंदवाडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी मानले.