Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*घोसरवाड येथे सौर हायमॅक्सचे उद्घाटन संपन्न*



 *घोसरवाड येथे सौर हायमॅक्सचे उद्घाटन संपन्न*

दत्तवाड- घोसरवाड तालुका शिरोळ येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास कार्यक्रमांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये सौर हायमॅक्स बसवण्याचा कार्यक्रम शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीमंत भवानीसिंग घोरपडे सरकार यांच्या हस्ते नुकताच पार पडला. 

या सौर हायमॅक्स साठी घोरपडे सरकार यांनी विशेष प्रयत्न केले होते. 

यावेळी सरपंच साहेबराव साबळे, उपसरपंच सरोजिनी चव्हाण ,मयूर खोत ,ग्रामसेवक संतोष चव्हाण, मातंग समाज संघटनेचे माजी अध्यक्ष खंडू भोरे, आप्पा कांबळे, संतोष पलसकर, दयानंद मिसाळ, इक्बाल मुल्ला यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते