*कनवाड म्हैसाळ बैरेज मुळे वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना तात्काळ द्या अन्यथा काम बंद पाडु ..आंदोलन अंंकुश*
*कनवाड म्हैसाळ बैरेज मुळे वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना तात्काळ द्या अन्यथा काम बंद पाडु ..आंदोलन अंंकुश*
कनवाड म्हैसाळ दरम्यान कृष्णा नदीवर बैरेज बांधण्याचे काम आपल्या पाटबंधारे विभागाकडून गेली वर्षभर चालू आहे. बैरेजचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदाराने म्हैसाळ हद्दीतील बाजूस मातीचा बांध घालण्यात आलेला होता तो मातीचा बांध पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने काढणे गरजेचे होतं किंवा तो बांध घालत असताना त्या बांधाला नदीचा प्रवाह जाण्यासाठी पाईप्स घालने गरजेचे होते .पण ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने बांध घातला व पावसाळा सुरू होण्यापूर्वी तो काढलाच नाही तसेच बॅरेजचे बांधकाम करत असताना पिलर खुदाई साठी जास्त क्षमतेच्या भूसुरुगांचा वापर केल्यामुळे परिसरातील जमिनीचा स्तर हादऱ्याने कुमकवत होता त्यातच ठेकेदाराने घातलेल्या चुकीच्या मातीच्या बांधामुळे कनवाड गावच्या बाजूने नदीने पात्र बदलल्यामुळे कनवाड हद्दीतील गट नंबर 191 ते 210 या गटातील सुमारे 10.5एकर जमीन वाहून गेली सदरची जमीन ठेकेदाराच्या चुकीमुळे आणि चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळे वाहून गेलेली आहे त्या बाबतीत महसूल पाटबंधारे आणि कृषी खात्याने दिनांक 25 /6 /2025 रोजी संयुक्त पंचनामा केलेला आहे त्यामध्ये सर्वस्वी ठेकेदाराची चूक दिसून येते. पण पाटबंधारे खात्याकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे .त्यामुळे सदर ठेकेदारावर तात्काळ कारवाई होऊन ठेकेदाराकडून वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून बाजारभावाप्रमाणे वसूल होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा कनवाड म्हैशाळ बैरेजचे काम बेमुदत बंद पाडू असे आशयाचे निवेदन म्हैशाळ ताकारी उपसा जल व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना देण्यात आले . त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असेल.
यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे, जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, रशीद मुल्ला, मुस्तफा इनामदार, घुडु पटेल इत्यादी उपस्थित होते .
