मितभाषी रमेश कोळी यांचे कार्य प्रशंसनीय : केंद्रप्रमुख सुभाष कुरूंदवाडे सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ
मितभाषी रमेश कोळी यांचे कार्य प्रशंसनीय : केंद्रप्रमुख सुभाष कुरूंदवाडे
सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ
दत्तवाड:प्रतिनिधी :आईचे प्रेम,संस्कार, प्रशासनाचे आदेश मानून केलेले प्रामाणिकपणे केलेले कार्य मितभाषी रमेश मारुती कोळी यांचे कार्य प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार दत्तवाड केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे यांनी काढले.कन्या विद्या मंदिर घोसरवाड शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रमेश मारुती कोळी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सदिच्छा समारंभात बोलत होते.अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयसिंग मारुती वडर हे होते.
आईचे प्रेम व नाते प्रेरणादायी असते.ते सांभाळणारे व प्रेमाने वागणारे रमेश कोळी यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सामाजिक कार्यकर्ते खंडू भोरे यांनी व्यक्त केले.
आपले संपूर्ण आयुष्य शाळेसाठी घालविणाऱ्या रमेश कोळी यांनी मला ओळख करून दिली याचा अभिमान असल्याचे त्यांचे सुपुत्र प्रतिक कोळी यांनी सांगितले.
सत्कारमूर्ती रमेश मारुती कोळी यांनी आपल्या मनोगतात संपूर्ण कार्यकिर्दीत सहकार्य करणाऱ्या विषयीकृतज्ञता व्यक्त करताना अश्रू पाणावले.
याप्रसंगी संजय निकम,सहदेव माळी,गांधी कांबळे,विद्याधर मोकाशी,दत्तात्रय कमते यांनी रमेश कोळी यांच्या विषयी गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रदीप पाटील,कावेरी खोत,प्रियांका गावडे,प्रियांका नंदिकुरळे, माधुरी घुले,वैशाली कांबळे,रमेश तराळ, ज्योती परीट,स्वाती खुरपे,शिवाजी ठोंबरे यांचेसह विद्यार्थिनी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक हिंदुराव फासके यांनी तर विद्याधर मोकाशी यांनी आभार मानले.सूत्रसंचालन गुंडा परीट यांनी केले.
