Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

आरोग्य हीच धनसंपदा आहे -डॉ. दिपीका कोकरे श्रावणमास रविवारीय व्याख्यानास प्रारंभ


 आरोग्य हीच धनसंपदा आहे -डॉ. दिपीका कोकरे

श्रावणमास रविवारीय व्याख्यानास प्रारंभ

दत्तवाड:प्रतिनिधी :आरोग्याकडे लक्ष देताना स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे.पैशांमुळे सर्वांच्याकडे मोबाईल आल्याने शारीरिक,मानसिक स्वास्थ मिळत नाही.आपल्या मुलांच्याकडे लक्ष देणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. मनाने आनंदी राहिल्यास आरोग्य चांगले राहते.आपण स्वतःसाठी वेळ देवून स्वतःची काळजी घेवून इतरांशी संवाद साधून मनातील भावना व्यक्त करावे. मनामध्ये कोणतीही भीती ठेवून जगू नका.बिनधास्त जगण्याची गरज आहे.वृध्दांच्याकडे मानसिकदृष्ट्या पाहणे गरजेचे आहे.श्री वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट कुरुंदवाड यांच्या वतीने आयोजित श्रावणमासा निमित्त कल्लेश्वर मंदिर कुरुंदवाड येथील "आरोग्यमं धनसंपदा'' या विषयांवरील व्याख्यान डॉ.दिपीका कोकरे यांच्या पहिल्या पुष्पाने सुरुवात झाली. त्यावेळी डॉ.दिपीका बोलत होत्या.अध्यक्षस्थानी सौ. सुजाता बाळासाहेब हलवाई होत्या.स्वागत सौ.स्मिता फल्ले यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ.सारिका आवटी यांनी करुन दिला.



        याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. देवराज मगदूम,सच्चिदानंद आवटी,डॉ. मनोहर कोरे,शंकर मेंगे,कुमार महामुनी पोतदार,सुरेश आवटी,स्वप्नील कुंभार यांचे सह समाज बांधव,नागरीक उपस्थित होते.