दत्तवाड- मलिकवाड, दत्तवाड- एकसंबा, बंधाऱ्यावर पाणी,वाहतूकीसाठी फेरा.
दत्तवाड- मलिकवाड, दत्तवाड- एकसंबा, बंधाऱ्यावर पाणी,वाहतूकीसाठी फेरा.
दत्तवाड: प्रतिनिधी :महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील दूधगंगा नदीवरील असणारे दत्तवाड- मलिकवाड,दत्तवाड- एकसंबा बंधारे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे आहेत.शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी तर उपयुक्त आहेतच शिवाय नदीपलीकडील शेतीवाडीत जाण्यासाठी मलिकवाड,एकसंबा येथून कर्नाटक राज्यात जाण्यासाठी अतिशय जवळचा वाहतुकीचा मार्ग म्हणूनही उपयुक्त.
गेले चार पाच दिवस दूधगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असणाऱ्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नदीपात्रात कमालीची वाढ होत आहे.पर्यायाने दूधगंगा नदीवरील दत्तवाड- मलिकवाड व दत्तवाड- एकसंबा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.जवळचा वाहतुकीचा मार्ग बंद झालेने कर्नाटक हद्दीतील शेतीवाडीत जाण्यासाठी तसेच कर्नाटकात जाण्यासाठी दानवाड- एकसंबा व दत्तवाड-सदलगा या पुलांचा आधार घ्यावा लागत आहे. आपण वाचत आहात जेडी न्यूज पर्यायाने १०ते १५ किलोमीटरचा अधिकचा फेरा सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर नदीपात्रालगतची गवताची कुरणे पाण्याखाली गेल्याने हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.नदीकाठावरील विद्युत मोटारी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर पिके पाण्याखाली जावून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे.
