Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड केंद्रस्तरीय पहिली शिक्षण परिषद संपन्न.

 


दत्तवाड केंद्रस्तरीय पहिली शिक्षण परिषद संपन्न.

दत्तवाड:प्रतिनिधी :२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील दत्तवाड केंद्राची पहिली शिक्षण परिषद कन्या विद्या मंदिर हेरवाड ता.शिरोळ येथे संपन्न झाली.या शिक्षण परिषदेत परख राष्ट्रीय सर्वेक्षण अहवाल महाराष्ट्र व कोल्हापूर सद्यस्थिती संदर्भात मार्गदर्शन,नवीन अभ्यासक्रमा नुसार इ.१ ली व २ री साठी विषय योजना व शालेय वेळापत्रक,आयडॉल शिक्षक निवड व शैक्षणिक संस्था,शाळा बैंक तयार करणेबाबत मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण संदर्भात मार्गदर्शन,केंद्रातील शिक्षकांच्या मागणी नुसार व गरजेनुसार विषय व शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त पुस्तक परिचय,PGI संदर्भात महाराष्ट्र व कोल्हापूर सद्यस्थिती संदर्भात सविस्तर मार्गदर्शन झाले.

        केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे, हिंदूराव फासके,विनायक कांबळे यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाची कामगिरी केली.या प्रसंगी दत्तवाड केंद्रातील मुख्याध्यापक,अध्यापक उपस्थित होते. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी कन्या विद्या मंदिर हेरवाड शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तराळ व सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभले.