Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

माणसाला माणूस म्हणून जगविणे हाच धर्म - बाबासाहेब नदाफ श्रावणमास रविवारीय व्याख्यानमाला

 


माणसाला माणूस म्हणून जगविणे हाच धर्म - बाबासाहेब नदाफ

श्रावणमास रविवारीय व्याख्यानमाला

दत्तवाड:प्रतिनिधी : रक्ताचा धर्म एकच आहे.सर्व प्रकारचे भेद सोडून देश जोडणे महत्वाचे आहे.कर्म सिद्धांत म्हणजे धर्म,महामानवांची शिकवण बाजूला ठेवून स्वार्थासाठी धर्मांध माणूस द्वेष निर्माण करतो.वेगळा विचार करून माणूस म्हणून जगणे हेच श्रेयस आहे. माणसाला माणूस म्हणून जगविणे हाच खरा धर्म आहे.असे प्रतिपादन श्री वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट कुरुंदवाड यांच्या वतीने आयोजित श्रावणमासा निमित्त कल्लेश्वर मंदिर कुरुंदवाड येथील 'खरा तो एकची धर्म'या विषयांवरील व्याख्यानमालेत राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ बोलत होते. अध्यक्षस्थानी दिपक परीट होते.स्वागत अॅड.देवराज मगदूम पाहुण्यांचा परिचय सच्चिदानंद आवटी यांनी करुन दिला.

        याप्रसंगी डॉ.मनोहर कोरे,महादेव मगदूम,किशोर खोत,सुधाकर औरवाडे, शंकर मेंगे,हेमंत आवटी,स्वप्नील कुंभार, अनिल पाटील,दिलीप मठपती यांचे सह समाज बांधव,नागरीक उपस्थित होते.