दत्तवाड मध्ये माधुरीसाठी मुक मोर्चा. सर्व धर्मीय, सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग
दत्तवाड मध्ये माधुरीसाठी मुक मोर्चा.
सर्व धर्मीय, सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग .
दत्तवाड.- गुजरात मधील वनताराकडे सुपूर्द केलेला नांदणी (ता. शिरोळ) येथील महादेवी माधुरी हत्तीनीचा ताबा परत स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाला परत मिळावा यासाठी गावातील प्रमुख मार्गावरून मूक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
सोमवार सकाळी दहा वाजता गांधी चौक येथून या मूक मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. या मूक मोर्चात सहभागी झालेल्या सर्वधर्मीय, सर्वपक्षीय, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गांधी चौक या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करून या घटनेचा निषेध व्यक्त केला. हा मूक मोर्चा गांधी चौक ते सदलगा वेस, उपाध्ये कोपरा, खंडोबा मंदिर कोपरा , दसरा चौक बाजारपेठ मार्गे गांधी चौक येथे पोचला. यावेळी सर्व धर्म, पक्ष आणि तमाम दत्तवाडवासीयांच्या वतीने दत्तवाड चे ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण ग्राम अधिकारी मुजावर यांना निवेदन देण्यात आले. या मूक मोर्चा मध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चामधील मधील प्रत्येक महिला आमचा माधुरी परत आणून द्या, असे म्हणत महिलांच्या डोळ्यात अश्रू होते. आमची ही मागणी निवेदनाद्वारे शासनापर्यंत पोहोचवा अशी विनंती या महिला करत होत्या.
यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच रफिक मुल्ला, पंचायत समिती माजी सभापती मिनाज जमादार, ग्राम अधिकारी मुजावर, पोलीस पाटील संजय पाटील, गुरुदत्त कारखान्याचे संचालक बबन चौगुले, राजगोंडा पाटील - गुमटे, विवेक चौगुले, ग्रा. प. सदस्य बाबुराव पवार, प्रवीण सुतार, देवराज पाटिल, बसगोंडा पाटील- सुळकुडे, डी.एन. सिदनाळे, लाला मांजरेकर, अझर नायकवडे, मौला नदाफ, युवराज घोरपडे,आण्णाप्पा सिदनाळे, सुरज शिंगे, सुकुमार सिदनाळे, भैय्या चौगुले, प्रकाश सिदनाळे ,मनीषा चौगुले, प्रियांका चौगुले, सुरेखा सुतार त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, महिला, सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


