Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सौ सुजाता अमोल जाधव यांना निवडून देण्याचा प्रभागातील मतदारांचा निर्धार

 



सौ सुजाता अमोल जाधव यांना निवडून देण्याचा प्रभागातील मतदारांचा निर्धार 

कुरूदंवाड - (मिलींद देशपांडे)

प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार सौ सुजाता अमोल जाधव यांना नगरपालिका निवडणुकीत निवडून देण्याचा निर्धार मतदारांनीच केला असून प्रभागातील मतदारांनीच मतदान प्रक्रिया हातात घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. 

  जाधव कुटुंबीय सर्वसामान्य असून सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जाण्याचा त्यांच्या स्वभाव प्रभागात चर्चेचा विषय झाला आहे त्यामुळे प्रभागातील सर्व मतदारांनी निवडणूक आपल्या हातात घेऊन सौ सुजाता अमोल जाधव यांना यावेळी निवडून देण्याचा निर्धार केला आहे. 

2019 व 2021 चा महापूर त्यानंतर आलेला कोरोनाचा काळ या काळात या कुटुंबीयांनी सर्वसामान्य जनतेला धीर देऊन अनेक कामे केली. प्रभागासह गावात सर्व समारंभ कार्यक्रमात ते भाग घेऊन लोकांना मदत करतात यामुळे अशा सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य सौ सुजाता अमोल जाधव यांनाच यावेळी मतदान करून नगरपालिकेत पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केला असून तेच प्रभागात त्यांचे असणारे चिन्ह हात एकमेकाला दाखवत सांगत प्रचार करीत आहेत. सर्वसामान्य जनतेने व मतदारांनी या प्रभागात निवडणूक आपल्या हातात घेतली असून यावेळी जाधव यांना निवडून देण्याचा निर्धार पक्का केला आहे.