Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा जागर गावागावात झाला पाहिजे.! प्रा. दीक्षा कांबळे

 


*सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा जागर गावागावात झाला पाहिजे.! प्रा. दीक्षा कांबळे 

दत्तवाड/प्रतिनिधी: मिलिंद देशपांडे 

धर्म, संस्कृती व परंपरेच्या जोखडात वर्षानुवर्षे अडकलेल्या स्त्रीला मुक्त करण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले असून त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आजच्या स्त्रीला सर्व क्षेत्रात उंच भरारी घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्त्रियांनी व्रत वैकल्ये, उपास तपास या पासून अलिप्त राहून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा जागर गावागावात घालावा असे आवाहन प्रा. दीक्षा कांबळे यांनी आज येथे बोलताना व्यक्त केले. 

     त्या सिद्धार्थ करिअर अकॅडमी ने आयोजित केलेल्या राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या कोमलताई भोपे या होत्या.

           प्रारंभी सामाजिक कार्यकर्त्या कोमलताई भोपे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

         कांबळे बोलताना पुढे म्हणाल्या. व्रत वैकल्ये,पूजा अर्चा, व चूल मूल या चक्रव्यूहात अडकलेल्या स्त्रीला खऱ्या अर्थाने मुक्त करण्याचे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले आहे. या साठी प्रत्येक स्त्रीने गावागावात जाऊन सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा जागर करावा असे आवाहन ही त्यांनी केले.

       प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. विशाल कांबळे यांनी केले. तर आभार संस्थेच्या संचालिका जयश्री कांबळे यांनी मानले.

🙏🙏

*सिद्धार्थ करिअर अकॅडमी*

*तेरवाड ता. शिरोळ.*