Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

नवीन पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 


 दत्तवाड -नवीन पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे  बोलक्या बाहुल्याचे व जादूगार शरद कुंभार होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेजे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय तावदारे होते.



कुंभार यांनी आपल्या कला सादर करताना अनेक प्रबोधनात्मक गोष्टीचा वापर करून मुलांवर सुसंस्कार कसे करावेत याबरोबरच विद्यार्थ्यांनी कष्ट करून ज्ञान प्राप्त करावे असे आव्हान केले. 
    यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु, चित्रकला , व रांगोळी प्रदर्शन याचे दत्तात्रय कचरे, व मान्यवरांच्या  हस्ते उद्घाटन   झाले .
प्राथमिक शाळेला मदत केलेल्या दानशूर व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
    दुपारच्या वेळी शाळेच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाच कार्यक्रम पार पडला. 
कार्यक्रमास प्राथमिकचे चेअरमन अजित चौगुले, नेमिनाथ नेजे, सुरेश मलकाने, दीपक गवळी,कपिल मलिकवाडे, बाबासो नेजे, महावीर दानवाडे, प्रमुख उपस्थित होते .
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एम आर पाटील यांनी केले. सुरेश चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सारिका शिंदे ,रेश्मा सुतार यांनी क्रीडा व बौद्धिक बक्षिसाचे वाचन केले तर आभार पल्लवी गळगे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदा देशपांडे यांनी केले.
यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.