डिजिटल युगात विद्यार्थ्यांना पालक शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे प्रा. मनोहर कोरे
दत्तवाड - आधुनिक युगात विद्यार्थ्यांना घडवताना शिक्षकांबरोबरच पालकांची भूमिका महत्त्वाच्या असून हल्लीचे जग डिजिटल चे आहे. मात्र डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी काय पाहिलं पाहिजे यावर नियंत्रण ठेवणे व मार्गदर्शन करणे हे पालकांचे व शिक्षकांचे प्रमुख काम असून त्यासाठी त्यांनी प्रभावीपणे उपाययोजना करावी तरच भावी पिढी सुसंस्कृत व संस्कार असणारी घडेल असे प्रतिपादन प्रा. डॉ. मनोहर कोरे यांनी केले ते हॅपी इंग्लिश स्कूल शिरोळ येथे पालकांची शाळा या उपक्रमात डिजिटल युगातील सुजाण पालकत्व या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते पालकांच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून प्रा. सुनिल बामणे यांनी काम पाहिले.
हॅपी इंग्लिश स्कूल शिरोळ येथे पालकांची शाळा हा अनोखा उपक्रम घेतला जातो. शनिवारी झालेल्या या शाळेत स्नेहा पेंढे जकाते मानसशास्त्रज्ञ जयसिंगपुर यांनी मुलांच्या भावना समजून घेताना या विषयावर मार्गदर्शन करताना पालकांना विविध उपाय योजना व घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले तर उत्तम तळवार यांनी छंद माझा वेगळा या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या अंगी असणारा छंद पालकांनी शिक्षकांनी शोधून त्याविषयी मार्गदर्शन करावे छंद जोपासताना त्यासाठी कसा वेळ द्यावा व छंद व छंदाचे जीवनात होणारे फायदे याबरोबरच छंद आणि करिअर यावर मार्गदर्शन केले.
यावेळी पालकांनी आपल्या मनातील अनेक शंका विचारून त्याचे निरसन करून घेतले.
आभार पालकांच्या सभेचे मुख्याध्यापक सुनिल बामणे यांनी मानले यावेळी संस्थेचे सेक्रेटरी गुरुप्रसाद रिसबूड , एस पी हायस्कूल कुरुंदवाड चे माजी मुख्याध्यापक पी आर कुलकर्णी, संचालिका अपर्णा पुजारी मुख्याध्यापिका मधुरा देशपांडे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते


