Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

शेडशाळ येथे महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा, मशरूम उत्पादन तंत्रज्ञान व विशेष प्रशिक्षण उत्साहात



दत्तवाड/ प्रतिनिधी:  -

      महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेडशाळ (ता. शिरोळ) येथे महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा व मशरूम उत्पादन तंत्रज्ञान याबाबत एक दिवसीय विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

     नाशिकचे मशरूम उद्योजक किरण पवार यांनी मशरूम म्हणजे काय, मशरूमच्या विविध प्रजाती, पोषक घटक व औषधी गुणधर्म, विविध प्रकार, मशरूम लागवडीसाठी लागणारे साहित्य व उपलब्धता, मशरूम स्पॉन, उत्पादन तंत्र, ओयस्टर मशरूम उत्पादन तंत्र, बटन मशरूम उत्पादन तंत्रज्ञान, कंपोस्ट तयार करण्याची पद्धत, मशरूमचे लोकल ते ग्लोबल मार्केट डिमांड व प्रक्रियायुक्त उत्पादने यावर मार्गदर्शन केले. सिद्धार्थ मशरूम रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्योजिका श्रीमती चेतना पवार यांनी मशरूम व्यवसायातील विविध वाव व संधी, मशरूम वरील कीड व रोग व्यवस्थापन, ग्रेडिंग, पॅकेजिंग व आवश्यक परवाने, तापमान नियंत्रित कसे करावे मी, मशरूम उद्योजक यशोगाथा, मशरूम उगविण्याचा कालावधी, तोडण्याची पद्धत, मशरूमचे बेड तयार करण्याची पद्धत, बेड ठेवण्याचे प्रकार, मशरूम तोडण्याच्या पद्धती विषयी विस्तृत अशी माहिती प्रोजेक्टर द्वारे दिली. एम. सी. डी. सी. पुण्याचे प्रशिक्षण अधिकारी मयूर पवार यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना बाबत माहिती दिली. तर नागपूर विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. दिलीप वैरागडे यांनी उद्योजकता विकास परिचय, उद्योजकाचे गुण व ध्येय, शेती व्यवसाय व्यवस्थापन व व्यवसायाची वृद्धी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. 

      प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. एम. सी. डी. सी. पुण्याचे विभागीय समन्वयक अरुण काकडे यांनी प्रास्ताविका मध्ये एम. सी. डी. सी. च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सर्वच मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक रणजीत कदम, ज्योतीकुमार पाटील, भैय्यासो पाटील, महेंद्र बागे, संचालिका अस्मिता पाटील, संगीता पाटील कोथळीकर, पंचायत समिती सदस्या राजश्री माणकापूरे, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, दीपक कळेकर, संतोष दुधाळे, शिरोळच्या सहाय्यक निबंध सहकारी संस्था श्रीमती उर्मिला राजमाने, ओंकार पुदाले, रावसाहेब चौगुले, हाजी आबासो गौस पाटील, अशोक शिरढोणे, शमशादबी पठाण, संजय मगदूम, आप्पासो मगदूम, आबासो पाटील, सुरेश केरीपाळे, राजेंद्र चौगुले, अशोक केरीपाळे, अमोल पाटील यांच्यासह महिला प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.