Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी लाला मांजरेकर यांची निवड



दत्तवाड ता. शिरोळ येथील लालासाहेब दस्तगीर कोथळे (मांजरेकर) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) च्या अल्पसंख्याक सेल शिरोळ तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. कोल्हापूर येथील शाहू मार्केट यार्ड मध्ये झालेल्या कोल्हापूर जिल्हा अल्पसंख्याक विभाग आढावा बैठकीमध्ये त्यांची निवड जाहीर करण्यात आली. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष ॲड. नाजीर काजी,  जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष आदिल फरास, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर सर, प्रदेशउपाध्यक्ष राष्ट्रवादी सेवा दल बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, इचलकरंजी शहर अध्यक्ष सुहास जांभळे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत, महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद विद्या पाटील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संतोष पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक प्रा. किसन चौगुले सर,       

चंद्रकांत तांबवे, भाऊसो चौगुले, पिंटू नरमदे, नयन कांबळे, मनिष कांबळे, धनाजी शिंदे, संजय तिवडे, मोहसिन सय्यद, मेहबूब अपराध, केतन कामत, यासीन नदाफ, सद्दाम काले, राजू वडर त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.