पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
दत्तवाड- प्रतिनिधी (मिलिंद देशपांडे)
आधुनिक भारताचे निर्माते, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दत्तवाड येथील जेष्ट पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांच्या घरी साजरी करण्यात आली.
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, सरपंच अनिता कडाके, उपसरपंच राखी कोळी, ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण, माजी सरपंच चंद्रकांत कांबळे, यांच्या हस्ते मूर्तीस पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले.
१४ एप्रिल हा दिवस सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून साजरी केली जाते.
ग्रामपंचायत, बौद्ध विहार आदी ठिकाणी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील संजय पाटील, ग्रा.पं. सदस्य रफिक मुल्ला, बाबुराव पवार, धन्यकुमार सिदनाळे, ॲड. सुरेश पाटील, ॲड. युवराज घोरपडे, अमित माने, भैया चौगुले, प्रमोद पाटील, बसगोंडा पाटील, लाला मांजरेकर, नितीन कांबळे, राजू कांबळे, तेजस वराळे, रवींद्र कांबळे, प्रशांत कांबळे, विद्याधर कांबळे त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी, दत्तवाड पत्रकार संघाचे सदस्य,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

