Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाडात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात.



दत्तवाड:प्रतिनिधी:(मिलिंद देशपांडे)

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दत्तवाड ता.शिरोळ येथे मोठया उत्साहात पार पडली.

       प्रारंभी केंद्रीय शाळेसमोरील पटांगणात सलोनी प्रकाश कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

         माजी सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी प्रास्ताविकात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.सेवानिवृत्त मुख्याध्यापक एल.डी.कांबळे यांनी बाबासाहेबांच्या विचाराचे अनुसरण करण्याची गरज असल्याचे सांगितले. माजी उपसरपंच रफिक मुल्ला यांनी ही बाबासाहेबांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.प्रमुख व्याख्यात्या वसुंधरा कबनूरकर यांनी बाबासाहेब यांनी सामाजिक,आर्थिक व जातीभेदाची विषमता दूर करून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचे मूलभूत अधिकार देण्यासाठी आयुष्यभर झिजले.त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले.

         सरपंच सौ.अनिता कडाके, उपसरपंच सौ.राखी कोळी,जवाहर नवोदय निवडी कु.दिया शिंगे,शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल कु.संबोधिनी सुंदर कांबळे यांचेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे,शासकीय - निमशासकीय सेवेत निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला.



         सामाजिक व वंचिताच्या प्रश्नावर लेखणीद्वारे वाचा फोडण्याचे कार्य केल्याबद्दल पत्रकार दिलीप शिरढोणे, संजय सुतार,इसाकअहमद नदाफ, मुन्नाभाई नदाफ मिलिंद देशपांडे,युनुस लाडखान,सामाजिक कार्यकर्त्या वैशाली कांबळे यांचा वंचित बहुजनआघाडीच्या वतीने संविधानाची उद्देशिका देवून विशेष सन्मान करण्यात आला.दरम्यान कुरुंदवाड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने,बीट अंमलदार महावीर कराडे यांनी भेट देवून बाबासाहेबांच्या प्रतिमेस आभिवादन केले.

         याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी संतोष चव्हाण,ज्येष्ठ नेते धन्यकुमार सिदनाळे,पोलिस पाटील संजय पाटील, अॅड.सुरेश पाटील,अॅड.युवराज घोरपडे,विवेक चौगुले,भैया चौगुले, रफीक मुल्ला,अमित माने,प्रमोद पाटील,लाला मांजरेकर,चंद्रकांत सनदी, कल्लाप्पा कडाके,विद्याधर कांबळे, तेजस वराळे,प्रशांत कांबळे,सूरज शिंगे, नटराज माळगे,आप्पासो कांबळे, दादासो कांबळे यांचेसह जयंती समारोह कमिटी,ग्रामस्थ उपस्थित होते.कु.पूर्वा व प्रतीक्षा कांबळे यांनी सूत्रसंचलन केले.