आर. के. हायस्कूल, राजापूरवाडी चे N.M.M.S. परीक्षेत सुयश
आर. के. हायस्कूल, राजापूरवाडी चे N.M.M.S. परीक्षेत सुयश
दत्तवाड - इयत्ता आठवीसाठी असणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती (N.M.M.S.)परीक्षेत आर. के. हायस्कूल, राजापूरवाडी च्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शासनामार्फत दरवर्षी 12 हजार रुपये याप्रमाणे सलग चार वर्ष शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्यालयातील कु. श्रेया जगदीश कोळी, कु. प्राजक्ता गुरुराज डंगी व शौर्य विजय पुजारी हे तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. तिघांना मिळून तब्बल 1,44,000 इतकी शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
वरील विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सौ. माणगावे ए. वाय. , शिक्षक श्री. शिरोटे आर. ए. , श्री. मुराबट्टे व्ही. एस. , श्री. श्रीनाथ पाटील, श्री. पाटील व्ही. के., श्री. अकिवाटे एस. जी. या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक श्री. काटकर जे. ए. यांचे प्रोत्साहन लाभले. श्री आदर्श शिक्षण संस्था, कोथळी चे चेअरमन व सर्व संचालक यांची प्रेरणा लाभली. यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक श्री. काटकर जे. ए. यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

