Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाडमध्ये 'आधार महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न.

 


दत्तवाडमध्ये 'आधार महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न.

दत्तवाड (प्रतिनिधी): "सहकार्यातून सहकार आणि सहकारातून प्रगती" या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन दत्तवाड येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आधार महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.दत्तवाड या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दि.१४ मे २०२६  रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



​         ​या संस्थेचे उद्घाटन सिद्धगिरी संस्थान,कणेरी मठ येथील परमपूज्य श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत कर्णसिंह दौलतराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) हे होते.

        ​याप्रसंगी राजकीय आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती होती.प्रामुख्याने उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील,आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर,माजी खासदार राजू शेट्टी,

​माजी आमदार उल्हासदादा पाटील

विजीतसिंह शिंदे सरकार,प्रमोददादा पाटील,जि.प.सदस्य,प्रशांत शहापूरे,अॅड.सुरेश पाटील,उदय पाटील,चंद्रकांत कांबळे, नूर काले,हरिश्चंद्र पाटील,बंडू पाटील, सी.डी.पाटील,दिपक गायकवाड,अक्षय आलासे यांनी उपस्थित राहून नूतन संस्थेस आणि महिलांच्या या आर्थिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

     


 

   ​दत्तवाड येथील डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह,गांधी चौक येथे हा सोहळा पार पडला.महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि ग्रामीण भागात सहकाराचे जाळे मजबूत करण्यासाठी या क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे.

​    ​या संस्थेच्या उभारणीत संस्थापक चेअरमन ॲड.सौ.राजेश्वरी रमेश पाटील यांनी पुढाकार घेतला असून,त्यांना व्हा.चेअरमन सौ.ज्योती चंद्रशेखर कलगी आणि ​संचालिका ​सौ.राणी तानाजी खेमलापुरे,​सौ.डॉ.अनिता बसवराज पाटील,सौ.सीमा प्रमोद पाटील,सौ.प्रियांका चंद्रशेखर माने,​सौ.मनिषा महेश हेरवाडे,​सौ.अश्विनी संजय देवमोरे,​सौ.लक्ष्मी कुमार धुमाळे,​सौ.श्वेता महेश पाटील,​सौ.सुमन सुरेश पाटील,सल्लागार मंडळातील ​सौ.गंगाताई अविराज कमते,​सौ.सुप्रिया सुहास पाटील,​सौ.कल्पना शंकर पाटील,​सौ.सुनिता बिरदेव पुजारी​, सौ.बेबीताई आणगोंडा पाटील यांचेसह इतर महिला सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

             ​या कार्यक्रमाला दत्तवाड परिसरातील नागरिक,सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या नवीन संस्थेमुळे महिलांच्या आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.