Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*दत्तवाड येथे इंधन दरवाढी विरोधात बैलगाडीने काढला मोर्चा* दत्तवाड काँग्रेस व इतर घटक पक्षाच्या वतीने केला निषेध.

  


*दत्तवाड येथे इंधन दरवाढी विरोधात बैलगाडीने काढला मोर्चा*

दत्तवाड काँग्रेस व इतर घटक पक्षाच्या वतीने केला निषेध.

दत्तवाड : प्रतिनिधी

सध्या केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल दरवाढीची भूमिका घेतल्याने यासाठी सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. याच विरोधात दत्तवाड येथील काँग्रेस गटाने व इतर घटक पक्षाच्या वतीने बैलगाडीतून मोर्चा काढली गेली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस उदय पाटील, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सुरेश गुंडू पाटील, ॲडव्हीकेट युवराज घोरपडे, एन एस पाटील, ॲडव्हीकेट सुरेश पाटील, सुरज शिंगे, काँग्रेस महिला आघाडीच्या दिपाली पाटील, गायत्री कुरूंदवाडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी इंधन दरवाढी विरोधात आपली प्रतिक्रियांद्वारे नाराजी व्यक्त केली.

  परिणामी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेल केलेल्या दरवाढीमुळे संपूर्ण राज्यात आर्थिक स्थिती कोलमोडली असून याच विपरीत परिणामामुळे महिनाभरात इंधन तुटवडा होणार असल्याने काही -  काही ठाकणी पेट्रोल पंपावर वाहान धारकांनी खूप मोठी गर्दी करित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

  केंद्र सरकारने इंधन दरवाढ जो पर्यंत माघार घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशीच चालू ठेवणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटीणीस उदय पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

   यावेळी आण्णासो कुरुंदवाडे, अमित माने, देवराज पाटील, रावसो पाटील, श्रावण कांबळे, मलगोंडा पाटील, संकेत पाटील, प्रमोद पाटील, राजू सुळकुडे, अभिषेक कांबळे, हेमंत आप्पाजीगोळ व विशाल कांबळे आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते.