Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

प्रदूषणमुक्त पंचगंगा हेच आमचे टार्गेट

 प्रदूषणमुक्त पंचगंगा हेच आमचे टार्गेट 

लोकशाही मार्गाने आंदोलन करताना पोलीस बळाचा वापर केल्यास त्याच ठिकाणी प्राणांतिक उपोषणास बसणार : धनाजी चुडमुंगे 

प्रदूषित पाणी सोडायला जवळची पंचगंगा नदी आणि पिण्यासाठी लांबची कृष्णा नदी ही इचलकरंजीची भूमिका पंचगंगा काठच्या नागरिकांवर अन्याय करणारी आहे पंचगंगा नदीत सोडले जाणारे रासायनिक पाणी रोखले नाही म्हणून इचलकरंजीचे पिण्याचे पाणी आम्हाला रोखावे लागत आहे.

न्यायासाठी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस बळाचा वापर झाल्यास त्याच ठिकाणी प्रानांतिक उपोषणास बसणार.

*प्रोसेस वर कारवाई साठी आंदोलन*

प्रोसेसचे रासायनिक पाणी सोडायला जमीन उपलब्ध नसताना प्रोसेस सुरु झाल्या हे कायद्याचे उल्लंघन असून  प्रदूषण नियंत्रण मंडळाने cetp ला लावलेले सील तोडले हे प्रदूषण नियंत्रण मंडळास आणि जिल्हाधिकारी यांना माहित झाले तरी प्रोसेस वर कारवाई केली नाही म्हणून आंदोलन करावे लागत आहे.

*पंचगंगा काठ वाचवणे महत्वाचे*

इचलकरंजीतील उद्योगानी कायद्याचे पालन करून उद्योग करावा पण कायदा धाब्यावर बसवून रासायनिक पाणी पंचगंगा नदीत सोडून पंचगंगा काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत असाल तर मात्र आम्हाला पंचगंगा काठ वाचवण्यासाठी उद्योगाणा विरोध करावा लागेल.

*इचलकरंजीतील नागरिकांनी आंदोलनात उतरावे*

पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी आंदोलन सुरु आहे आज इचलकरंजी शहरास  पिण्याच्या पाण्यासाठी सगळीकडून विरोध होताना दिसत आहे. भविष्यात शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळायचे असेल तर त्यांना पंचगंगा नदी शिवाय पर्याय नाही त्यामुळे इचलकरंजीतील नागरिकांनी आमच्या पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या लढ्यात सहभागी व्हावे.

*कायद्यापेक्षा पैसा मोठा ठरत आहे*

आपल्या देशात कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही असं म्हंटले जाते पण इचलकरंजीतील प्रोसेस याला अपवाद ठरत आहेत कारण पैशाच्या जीवावर त्यांनी सगळी प्रशासकीय यंत्रणा विकत घेऊन ते माणसं मारण्याचे कृत्य करत असताना कोणतंही सरकारी खातं त्यांना रोखत नाही याचा अर्थ कायद्यापेक्षा पैसा श्रेष्ठच आहे असंच म्हणावे लागेल.