वरिष्ठ नागरिक संघाचे जानकी वृद्धाश्रमला भरघोस मदत*
*वरिष्ठ नागरिक संघाचे जानकी वृद्धाश्रमला भरघोस मदत*
दत्तवाड- मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे वैशिष्ट्य घेऊन काम करणाऱ्या इचलकरंजी येथील वरिष्ठ नागरिक संघ, नर नारायण सेवा संस्था, व मानव सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घोसरवाड ता. शिरोळ येथील जानकी वृद्धाश्रम ला भरघोस मदत देण्यात आली व भविष्यातही अशीच मदत करण्यात येणार असल्याची माहिती तिन्ही सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटीवेळी दिली.
जानकी वृद्धाश्रम येथे पस्तीस पेक्षा जास्त वृद्ध सध्या वास्तवात आहेत त्यांच्या रोजच्या गरजा लक्षात घेऊन वरिष्ठ नागरिक संघ ,नर नारायण सेवा संघ व मानव सेवा संस्था यांच्या वतीने ब्रिज प्रेशर कुकर मिक्सर जेवणासाठी ताट वाटी ग्लास स्वयंपाकासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी देऊन येथील वृद्ध आजी-आजोबांची आदराने विचारपूस करून त्यांच्यासोबत मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेतला. याबरोबरच भविष्यात जानकी वृद्धाश्रमला मोलाची मदत केली जाईल, यात वृद्धाश्रमातील वृद्धांना वैद्यकीय उपचार मोफत करण्याचे त्यांनी सांगितले याबरोबरच हॉलमधील पंख्याची व्यवस्था करणार असल्याची ग्वाही नर नारायण सेवा संघाच्या वतीने ओमजी पोद्दार व राम गोपालजी माहेश्वरी यांनी दिली तर शिवजी तोष्णीवाल व त्यांच्या पदाधिकारी यांनी बसण्यासाठी खुर्च्या व इतर साहित्य देणार असल्याचे सांगितले यावेळी बुधराजजी सोनी, अशोकजी जाजू, राम स्वरूपजी पारेख, अरुणजी राजदंड, रेवजी जैन, नवरत्न लालजी लड्डा, पारस जी जैन ,नरेंद्र जी लाहोटी, यावेळी सर्व सेवा संघाच्या महिलांमध्ये देखील सह सर्वांनी वृद्धाश्रमाला भेट देऊन येथे सुरू असलेल्या मानव कल्याणाच्या कार्याची कौतुक केले. या सर्वांचे स्वागत स्वागत वृद्धाश्रम चे संस्थापक डॉ. बाबासाहेब पुजारी व त्यांच्या मातोश्री सुशीला पुजारी यांनी केले. आभार अण्णासाहेब कदम सदलगा यांनी मांणले
