कलावती दामोदर बाहेटी फाउंडेशन मार्फत घोसरवाड ता. शिरोळ येथील गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
दत्तवाड -
इचलकरंजी येथील कलावती दामोदर बाहेटी फाउंडेशन मार्फत घोसरवाड ता. शिरोळ येथील गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाशजी छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे गरीब होतकरू हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेणे शक्य होत नाही हे लक्षात घेऊन इचरकंजी येथील कलावती दामोदर बहेटी फाउंडेशन मार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे घोसरवाड तालुका शिरोळ येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी जानकी वृद्धाश्रम चे बाबासाहेब पुजारी, कृष्णात कांबळे, अरविंद कांबळे, सुभाष कांबळे, अर्जुन दावणे, श्रीकांत गवंडी फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)