पोटदुखीने हैराण आहात? 'हे' सोपे आयुर्वेदिक घरगुती उपाय नक्की करून पहा!*
*पोटदुखीने हैराण आहात? 'हे' सोपे आयुर्वेदिक घरगुती उपाय नक्की करून पहा!*
पोटदुखीवर (Stomach Ache) आयुर्वेदिक उपचार हा एक प्रभावी आणि सुरक्षित मार्ग आहे. आयुर्वेदानुसार, चुकीचा आहार, अपचन आणि गॅसमुळे पोटातील ' *वात' किंवा 'पित्त* ' दोष बिघडतो, व *पोटदुखी* होऊ लागते
*झटपट आराम देणारे घरगुती आयुर्वेदिक उपाय🥗*
*1)हिंग आणि कोमट पाणी:*
अर्धा चमचा हिंग कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटातील गॅस आणि कळा येणे त्वरित थांबते. लहान मुलांच्या पोटाला हिंगाची पेस्ट लावल्यानेही आराम मिळतो.
*2)आले आणि लिंबाचा रस:*
आल्याचा रस आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन त्यात थोडे सैंधव मीठ (सेंधा नमक) घालून चाटल्याने अपचनामुळे होणारी पोटादुखी थांबते.
*3)ओवा आणि कोमट पाणी:*
गॅस किंवा अपचनामुळे पोट फुगले असल्यास, १ चमचा ओवा थोड्या मिठासोबत चघळून वरून कोमट पाणी प्यावे.
*4)जिरे पाणी व पुदिना रस :*
१ चमचा जिरे पाण्यात उकळून ते पाणी कोमट करून प्यायल्याने पोटातील जळजळ आणि पित्त कमी होते.
*@प्रमुख आयुर्वेदिक औषधे ⚕️-*
*1)शंख वटी किंवा लसणादि वटी:* अपचन आणि गॅसमुळे होणाऱ्या पोटादुखीवर ही वटी गुणकारी आहे.
*2)हिंग्वाष्टक चूर्ण:*
जेवणाच्या पहिल्या घासासोबत हे चूर्ण तुपात मिसळून खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते आणि पोट दुखायचे थांबते.
*3)आम्लपित्त नाशक काढा* -पित्तामुळे दुखत असेल आम्लपित्त नाशक काढ्याने लगेच कमी होते यामध्ये पित्ताचे शमन करणारी कडवट औषधपासून हा काढा बनविलेला असतो
*4)त्रिफळा चूर्ण* -पोट साफ होत नसेल तर त्रिफळा चूर्ण 2चमचे 2वेळा कोमट पाण्यातून घेतले असता पोट साफ होते
*🍎पथ्य (काळजी काय घ्यावी )*
पोट दुखत असताना हलके आणि पाचक अन्न (जसे की मूग डाळीची खिचडी किंवा ताक) खावे.जास्त तिखट, तेलकट आणि जंक फूड खाणे पूर्णपणे टाळावे.जेवल्यानंतर लगेच एकाच जागी बसून न राहता थोडी शतपावली करावी.👍
डॉ. ओंकार अशोक निंगनुरे (आयुर्वेदाचार्य )
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
📞7028612340
