Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिस अभिवादन


 सहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिस अभिवादन

जयसिंगपूर : सुनील कानडे

सहकारमहर्षी स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीदिनी अनेक मान्यवरांनी पार्वती को- ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट यड्राव परिसरात असलेल्या स्मारक स्थळावर भेट देऊन आदरांजली वाहिली आणि शामराव आण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले.

 पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटच्या आवारात असलेल्या शामराव अण्णांच्या स्मारक स्थळावर सकाळपासून दर्शनासाठी शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते येत होते. याठिकाणी आण्णांचे स्मारक स्थळ फुलांनी सजवले होते. स्मारकस्थळी माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, युवा नेते आदित्य पाटील- यड्रावकर यांच्यासह यड्रावकर परिवारातील सदस्यांनी आण्णांच्या स्मारकाचे दर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूत गिरणीच्या कार्यस्थळावर संस्थेचे संचालक अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने स्वर्गीय शामरावआण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे असलेल्या शामरावआण्णा यांच्या अर्धपुतळ्याला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

शरद सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर स्वर्गीय शामरावआण्णा यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक आदित्य पाटील यड्रावकर यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाच्यावतीने तसेच अधिकारी व कर्मचार्‍याच्यावतीने पुष्पहार घालून स्वर्गीय शामरावअण्णा यांच्या स्मृतीस अभिवादन केले. पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट येथील स्मारक स्थळावर समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्या सीमा म्हैशाळ, प्रवीण देसाई, युवा नेते आदित्य पाटील यड्रावकर, अजय पाटील यड्रावकर, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ. स्वरूपा पाटील यड्रावकर, सौ. नितू पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्या सानिका पाटील यड्रावकर, राहुल बंडगर, महेश कलकुटगी, यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, पार्वती को ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज इस्टेटचे व्हाईस चेअरमन महावीर खवाटे, संभाजी मोरे, प्रेमला मुरगुंडे, अण्णासाहेब क्वाणे, कुरूंदवाडचे श्री. दिवटे, पार्वती औद्योगिक वसाहतीचे सिईओ अभिजीत पाटील, रंगराव कांबळे यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य, कुरुंदवाड नगरपालिकेचे नगरसेवक, जयसिंगपूर नगरपालिकेचे नगरसेवक, पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटचे सर्व संचालक, शरद सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्यासह गावागावातून आलेले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शरद शिक्षण व उद्योग समुहातील सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी भेट देऊन स्वर्गीय शामराव अण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले.