दत्तवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक काँक्रिटीकरण काम पूर्ण; आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांचा ग्रामस्थांच्या वतीने
दत्तवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक काँक्रिटीकरण काम पूर्ण;
आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.
दत्तवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील जनतेच्या अनेक दिवसांच्या मागणीची दखल घेत,या चौकाच्या काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत दर्जेदारपणे पूर्णत्वास नेण्यात आले आहे.हे महत्त्वपूर्ण काम मार्गी लावल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांचा दत्तवाड येथील ग्रामस्थ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बबन चौगुले,शरद साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण चौगुले,माजी सरपंच बी.वाय.शिंदे,माजी ग्रामपंचायत सदस्य बाबुराव पोवार,नूर काले आणि विनोद कागले आदी मान्यवर उपस्थीत होते.
चौकाचे काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून,आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी हा विकासनिधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
