Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

रविवारी बॅ.बाळासाहेब खर्डेकर पतसंस्थेच्या दत्तवाड शाखेचा नूतन वास्तू उद्घाटन सोहळा*

 



*रविवारी बॅ.बाळासाहेब खर्डेकर पतसंस्थेच्या दत्तवाड शाखेचा नूतन वास्तू उद्घाटन सोहळा*


​दत्तवाड:प्रतिनिधी:'शिक्षण,आरोग्य, सेवा आणि त्याग' या बोधवाक्याने प्रेरित होऊन काम करणाऱ्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर शिरोळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या; जयसिंगपूर च्या दत्तवाड शाखेच्या नूतन वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार,दि.२० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजिला आहे.​उद्घाटक खासदार धैर्यशील माने आहेत तर कार्यक्रमाचे ​अध्यक्षस्थान आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर भूषविणार आहेत.

​        कोल्हापूर जि.प.समाजकल्याण समिती सभापती सौ.श्रध्दा गायकवाड,पं.स.शिरोळ चे सभापती मिलिंद कुरणे,उपसभापती सौ.मनीषा कदम,जि.प.सदस्या सौ.उत्तरादेवी शिंदे,पं.स.सदस्य बाबासाहेब वनकोरे, सरपंच सौ.अनिता कडाके आणि शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

​      ​२८ जानेवारी १९९४ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने जयसिंगपूर,शिरोळ आणि दत्तवाड परिसरात सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.कार्यक्रमाचे स्थळ के.डी.सी.सी.बँकेजवळ,दत्तवाड असे आहे.

      तरी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे चेअरमन रमेश अशोक बन्ने,व्हाईस चेअरमन प्रकाश द.पुजारी,सेक्रेटरी सुनिल जि. सिदनाळे आणि सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.