Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

पत्रकारांच्या लेखणीतून अनेक प्रश्न मार्गी जानकी वृद्धाश्रम चे संस्थापक बाबासाहेब पुजारी

 



पत्रकारांच्या लेखणीतून अनेक प्रश्न मार्गी

जानकी वृद्धाश्रम चे संस्थापक बाबासाहेब पुजारी

घोसरवाड (वार्ताहर) पत्रकारांचे लेखणीतून अनेक प्रश्न मार्गी लागले असून अनेकांना न्याय मिळाला असल्याचे मत जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पुजारी यांनी घोसरवाड ता शिरोळ येथे बोलताना व्यक्त केले 

जानकी वृद्धाश्रम व सोशल फाउंडेशन च्या वतीने येथील पत्रकार संजय कोकणे यांना प्रेस मिडिया लाईव्ह पुणे यांचे वतीने लोकजागृती माध्यम रत्न पुरस्कार 2026 साठी निवड झाली आहे या निमित्त त्यांचा  सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते 

यावेळी पुढे बोलताना बाबासाहेब पुजारी म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा आहे त्यांच्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत पत्रकार संजय कोकणे यांनी देखील पत्रकारीतेच्या माध्यमातून एक चांगले समाज उपयोगी कार्य केले आहे त्यांना पुणे प्रेस मिडिया लाईव्ह च्या वतीने पुरस्कार मिळाला ही गौरवास्पद बाब आहे

यावेळी पत्रकार मिलिंद देशपांडे पत्रकार मुन्नाभाई नदाफ सुहास चौगुले बाळकृष्ण कोकणे अन्नापा पुजारी- हेरवाडे जयसिंग शिंदे सुशांत कोकणे रोहित कोकणे अमोल नरदे शितल पुजारी तुकाराम पुजारी अन्नापा नरदे शरद कागले मारूती हेरवाडे शांतु नरदे राजेंद्र कोकणे यांचेसह शंभूराजे तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते